पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महानगरपालिका संचलित जगद्गुरु संत तुकाराम महाराज संतपीठ अंतर्गत सुरु केलेले स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज व मुक्त सांप्रदायिक संगीत शिक्षण विभागाच्या वतीने राज्यस्तरीय पुरुष व महिला आणि आंतरशालेय भजन स्पर्धा दिनांक २८ ते ३० ऑक्टोबर, २०२३ रोजी आयोजित करण्यात आली आहे. सदर आंतरशालेय भजन स्पर्धेसाठी (१५ वर्षाखालील) संपर्क क्रमांक :९०२२८१६०५८ द्वारे नाव नोंदणी करणे अनिवार्य राहील. तसेच राज्यस्तरीय भजन स्पर्धेसाठी (महिला गटासाठी : ९६०४६१३४०२, पुरुष गटासाठी : ९६८९९१८९८९) द्वारे नाव नोंदणी करणे दिनांक २५ ऑक्टोंबर, २०२३ अखेर करणे अनिवार्य राहील.
आंतरशालेय भजन स्पर्धेतील विजेत्यांना सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र आणि सहभागी संघास सन्मानचिन्ह व त्यामधील प्रत्येक स्पर्धकास प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. राज्यस्तरीय महिला भजन स्पर्धा (खुला गट) आणि राज्यस्तरीय पुरुष भजन स्पर्धा (खुला गट) बक्षिसांचे स्वरूप पुढीलप्रमाणे असेल प्रथम क्रमांक १५०००/-, द्वितीय क्रमांक ११०००/-, तृतीय क्रमांक ७०००/-, उत्तेजनार्थ ४०००/-, उत्कृष्ट हार्मोनियम वादन ११००/, उत्कृष्ट तबला वादन ११००/-, उत्कृष्ट पखवाज वादन ११००/-, उत्कृष्ट गायक ११००/-, शिस्तबध्द संघ ११००/-, प्रथम येणाऱ्या तीस संघास प्रवेश दिला जाईल.
सदर स्पर्धेचे स्थळ : जगद्गुरु संत तुकाराम महाराज संतपीठ स्कुल अॅन्ड जुनिअर कॉलेज, पाटीलनगर, टाळगांव चिखली असे आहे.
२८ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी १० वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून अजित पवार – उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, पालकमंत्री पुणे जिल्हा तर विशेष अतिथी दिलीप वळसे पाटील – मंत्री सहकार, महाराष्ट्र राज्य, चंद्रकांत दादा पाटील – मंत्री उच्च व तंत्रशिक्षण, वस्रोउद्योग, संसदीय कार्ये, महाराष्ट्र राज्य, डॉ.नीलम गोऱ्हे, उपसभापती विधानपरिषद या उपस्थित राहणार आहेत. तर कार्यक्रमाचे उद्घाटन शेखर सिंह (भा.प्र.से) आयुक्त तथा प्रशासक तथा अध्यक्ष संतपीठ यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. यावेळी लोकसभा सदस्य श्रीरंग बारणे, सुप्रिया सुळे, डॉ. अमोल कोल्हे, संग्राम थोपटे विधानसभा सदस्या उमा खापरे, महेश लांडगे, अश्विनी जगताप विधानपरिषद सदस्य अण्णा बनसोडे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तसेच महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, उल्हास जगताप तसेच सदानंद मोरे – अध्यक्ष महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ तथा संचालक संतपीठ, अभय टिळक – माजी विश्वस्त आळंदी देवस्थान तथा संचालक संतपीठ संतपीठाचे मुख्य कार्यकारी अधिकारी – विजयकुमार थोरात व सचिव – संजय नाईकडे, तसेच संतपीठ संचालक – चंद्रकांत इंदलकर, प्रवीण जैन, संदीप खोत, तानाजी शिंदे हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत अशी माहिती संतपीठाचे संचालक डॉ.स्वाती मुळे व राजूमहाराज ढोरे यांनी दिली.