पिंपरी (Pclive7.com):- प्रज्वल पवार याची शालेय राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत निवड झाल्याबद्दल पिंपरी चिंचवड क्रिकेट असोसिएशन तर्फे सत्कार करण्यात आला. स्कूल गेम ऑफ फेडरेशन इंडिया यांच्या मार्फत पटना बिहार येथे दिनांक १६ जानेवारी ते २३ जानेवारी या कालावधीत आयोजित केलेल्या ६७ व्या राष्ट्रीय स्कूल गेम स्पर्धेत महाराष्ट्र संघात १७ वर्षाखालील गटात निवड झाल्याबद्दल पिंपरी चिंचवड शहर क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष जगदीश शेट्टी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी पिंपरी चिंचवड क्रिकेट असोसिएशनचे सचिव राजू कोतवाल, खजिनदार संजय शिंदे, विजय कोतवाल, प्रकाश पवार आदी उपस्थित होते. प्रज्वल पवार हा राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळ आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स पुणे येथे शिकत असून अल्फा क्रिकेट अकॅडमी वाल्हेकरवाडी येथे राजू कोतवाल यांच्याकडे क्रिकेटचे प्रशिक्षण घेत आहे.
























Join Our Whatsapp Group