पिंपरी (Pclive7.com):- वाकड येथील काळा खडक भागात सुरू होणाऱ्या एसआरए योजनेला स्थानिकांनी विरोध दर्शविला आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल जाधव यांच्या नेतृत्वात आज निदर्शन करण्यात आले.
खाजगी बिल्डरच्या माध्यमातून ही योजना राबवली जात आहे. कसलीही माहिती दिली जात नसून तुम्हाला घर देतो, राहती घर खाली करा असं आमिष दाखवलं जात आहे. मात्र काळाखडक परिसर कशा पद्धतीने विकसित केला जाणार याची कसलीही माहिती दिली जात नाही. उद्या घर खाली केले आणि घरे दिलीच नाहीत तर जायचं कुणाकडे हा प्रश्न असल्याने आम्ही या योजनेला विरोध करत असल्याचे आंदोलकांनी म्हटलं आहे.
या आंदोलनाबाबत अनिल जाधव यांनी म्हटले आहे की, गेले चाळीस वर्षापासून नागरिक या ठिकाणी राहत आहेत. एसआरए स्थापन झाल्यापासून खासगी बिल्डर काहींना हाताशी धरून काळाखडक उठवण्याचा प्रयत्न करत आहेत. आम्ही घर देतो, आम्ही तमुक देतो असे आमिष दाखविले जात आहे. दरम्यान एसआरए प्रकल्पाची कसलीही माहिती येथील रहिवाश्यांना दिली जात नाहीये. त्यामुळे येत्या सात दिवसात आम्हाला प्रकल्पाची सर्व सविस्तर माहिती न दिल्यास तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे.
























Join Our Whatsapp Group