पिंपरी (Pclive7.com):- कोकण खेड युवाशक्ती सामाजिक संस्था पुणे यांच्या वतीने खेड तालुक्यातील दहा शाळांना लॅपटॉप संगणकाचे वाटप करण्यात आले.
दुर्गम भागातील जिल्हा परिषद शाळांमध्ये शासकीय कामासाठी तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी संगणकाची आवश्यकता भासते. परंतु ग्रामीण भागात होणारा सततचा खंडित विद्युत पुरवठा यामुळे संगणक असूनही उपयोग होत नाही. कोकण खेड युवा शक्ती सामाजिक संस्था व ईसीए च्या माध्यमातून विविध 100 शाळांना लॅपटॉप वाटपाचा कार्यक्रम मागील वर्षी घेण्यात आला होता. त्याचाच भाग म्हणून याही वर्षी ज्या शाळांना लॅपटॉप वाटप करण्यात आले नव्हते अशा दहा शाळांना लॅपटॉप संगणकाचे वाटप युवाशक्तीच्या माध्यमातून करण्यात आले. युवाशक्ती द्वारे करण्यात आलेल्या उपक्रमाचे विविध शाळांचे मुख्याध्यापक व ग्रामस्थ यांच्या वतीने आभार मानण्यात आले व युवाशक्तीच्या माध्यमातून असे समाज उपयोगी उपक्रम राबविण्यात यावे यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी कोकण खेड युवाशक्ती सामाजिक संस्थेचे अध्यक्ष रुपेश मोरे, सचिव संदीप सकपाळ सर, कार्याध्यक्ष संतोष कदम, उपाध्यक्ष संदीप जाधव, सहखजिनदार नंदकुमार महाडिक त्याचबरोबर कार्यकारणीचे सदस्य मधुकर कदम, संदीप साळुंखे, अभिजीत कदम, रोशन चाळके, अनिल कोकीकर, सुधीर जाधव, अरुण यादव, प्रा. संदीप कदम त्याचबरोबर स्थानिक बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
























Join Our Whatsapp Group