पिंपरी (Pclive7.com):- यशवंतराव चव्हाण पुणे – मुंबई द्रुतगती मार्गावर हायवे ट्रॅफीक मॅनेजमेंट सिस्टीम अंतर्गत पुणे वाहिनीवर कि.मी ६३.००० येथे गॅन्ट्री उभारण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत उद्या मंगळवार दि.३० जानेवारी रोजी दुपारी १२ ते २ या वेळेत करण्यात येणार आहे. या कालावधीत पुण्याकडे जाणारी सर्व प्रकारची वाहने (हलकी तसेच जड-अवजड वाहने) यांची वाहतूक बंद राहील.
वाहनाधारकांना पर्यायी मार्गाने प्रवास करता येईल. मुंबईहून पुण्याकडे जाणारी हलकी वाहने कि.मी. ५४.४०० येथून कुसगाव टोलनाका येथून वळवून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ जुना मुंबई-पुणे महामार्गावरील पुणे वाहिनीवर मार्गस्थ करण्यात येतील, असे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने कळविले आहे.
























Join Our Whatsapp Group