पुणे (Pclive7.com):- कुख्यात गुंड शरद मोहोळची पत्नी स्वाती मोहोळ यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी आल्याची बामती समोर आली आहे. शरद मोहोळ हत्या प्रकरणातील आरोपी मुन्ना पोळेकर याच्या नावाने ही धमकी आली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मुन्ना पोळेकरच्या नावाने अकाउंट बनवत स्वाती मोहोळ यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे. काही दिवसापूर्वीच पुण्यात कुख्यात गुंड शरद मोहोळची गोळ्या झाडत हत्या करण्यात आली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, स्वाती मोहोळ यांना सोशल मीडियावर मेसेज आणि आक्षेपार्ह पोस्ट करत जीवे मारण्याची धमकी आली. मुन्ना पोळेकर च्या नावाने अकाउंट बनवत ही धमकी आली. मुन्ना पोळेकर हा शरद मोहोळ हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी आहे. स्वाती मोहोळ यांना ही धमकी आल्यानंतर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून तपास सुरु करण्यात आला आहे.
कुख्यात गुंड, गँगस्टर आणि हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ता शरद मोहोळ याची 5 जानेवारी रोजी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. शरद मोहोळच्या लग्नाचा वाढदिवशी त्याच्या आयुष्याची दोरी कापली गेली होती. कोथरूडच्या सुतारदरा परिसरात सव्वा एक वाजण्याच्या सुमारास हा हल्ला झाला होता. मोहोळ याच्या खुनाचा कट आखण्यात आणि त्याला अंतिम स्वरूप देण्यामध्ये कुख्यात गुंड विठ्ठल शेलार आणि गणेश मारणे या गुन्हेगारांचा समावेश असून यांच्यावर कारवाई करण्यात आली. मुन्ना पोळेकर आणि त्याच्या साथीदारांनी शरद मोहोळवर त्याच्याच घराजवळ ५ जानेवारी रोजी गोळ्या झाडत त्याचा खून केला होता. याप्रकरणात आतापर्यंत एकूण १५ आरोपींना अटक झाली आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या आठ ते नऊ जणांना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली आहे.
























Join Our Whatsapp Group