पिंपरी (Pclive7.cim):- पिंपरीत एक गाव एक शिवजयंती महोत्सवांतर्गत अखिल पिंपरी शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने शनिवार दिनांक २४ फेब्रुवारी ते रविवार, दि.४ मार्च पर्यंत विविध सामाजिक उपक्रम व शिवचरित्र व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये गुरुवार दि.१ मार्च रोजी सायं.७ वाजता पिंपरीतील भैरवनाथ चौकात सौरभ कर्डे, शनिवार दि.३ मार्च रोजी सायं.७ वाजता पिंपरीतील तपोवन मंदिर रोडवर प्रसाद मोरे आणि रविवार, दि.४ मार्च सायं.७ वाजता भाग्यनगर हैद्राबाद टायगर राजासिंह ठाकूर यांचे शिवचरित्रावर व्याख्यान होणार आहे.
रविवार, दि.४ मार्च रोजी महोत्सवाच्या सांगता समारोहानिमित्त सकाळी ७ वाजता श्री शिवमूर्तीस अभिषेक, सायं. ४ वाजता शगुन चौक ते पिंपरी शिवस्फूर्तिस्मारक भैरवनाथ चौकापर्यंत शिवछत्रपतींची भव्य पालखी मिरवणूक आयोजित करण्यात आली आहे. या वेळी भव्य मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिके व फायर शो आणि सामारोपप्रसंगी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवांतर्गत शनिवारी भोसरीतील अंधशाळेस मदतनिधी देण्यात आला. रविवार २५ फेब्रुवारी रोजी स. १० वाजता पिंपरी भैरवनाथनगर मोनिका २ येथे आरोग्य शिबिर व चित्रकला स्पर्धा, सोमवार दि.२६ फेब्रुवारी रोजी स.१० वाजता वायसीएम रुग्णालयात रुग्णांना फळवाटप, मंगळवार २७ फेब्रुवारी स.१० वाजता चिंचवडमधील गुरुकुलम अनाथआश्रमास मदतनिधी, बुधवार दि.२८ रोजी स.१० वाजता गोशाळेस मदतनिधी, गुरुवार दि.१ मार्च रोजी स.१० वाजता भैरवनाथ मंदिरात रांगोळी स्पर्धा, शुक्रवार दि. २ मार्च रोजी सायं.७ वाजता पिंपरीगावातील श्री शिव स्मारक येथे महाशिववंदना, शनिवार दि.३ मार्च रोजी स.९ वाजता पिंपरीगावात स्वच्छता अभियान उपक्रम आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या महोत्सवाच्या संयोजनात जगदंब प्रतिष्ठान, ज्योति मित्र मंडळ, भारत युवक विकास परिषद, शिवालय मित्र मंडळ, दीप मित्र मंडळ, गजानन मित्र मंडळ, भिमज्योत मित्र मंडळ, शंभू प्रतिष्ठान, जय भवानी मित्र मंडळ, स्वराज्य प्रतिष्ठान, शिवशक्ती मित्र मंडळ, शिवांजली मित्र मंडळ, समर्थ हनुमान मित्र मंडळ, पवना मित्र मंडळ, शिवछत्रपती मित्र मंडळ, शिवसाम्राज्य मित्र मंडळ, लोकमान्य डायमंड मित्र मंडळ, अमरदीप मित्र मंडळ, अभिमन्यू मित्र मंडळ, शिवाजी मित्र मंडळ, मित्र सहकार्य मित्र मंडळ, जोग महाराज प्रासादिक दिंडी, दक्षिणमुखी श्रीहनुमान मंदिर, श्री भैरवनाथ तालीम, श्री सावता महाराज मंदिर समिती, चैतन्य कानिफनाथ सेवा ट्रस्ट, संकल्प मित्र मंडळ, शिवदत्त मित्र मंडळ, आवाज मित्र मंडळ, शिवाई मित्र मंडळ, सावली ग्रुप, भगतसिंग मित्र मंडळ, औदुंबर सेवा प्रतिष्ठान, गोठा प्रतिष्ठान, धर्मवीर संभाजी मित्र मंडळ, अर्जुन मित्र मंडळ, आझाद मित्र मंडळ, अभिमन्यू मित्र मंडळ, सुदर्शन मित्र मंडळ, अजिंक्य मित्र मंडळ, राजेशाही ग्रुप, ईगल मित्र मंडळ, समस्त ग्रामस्त पिंपरी, सिंधी समाज, पिंपरी गुरुद्वारा आदि मंडळांनी सहभाग घेतला आहे.





















Join Our Whatsapp Group