चिंचवड (Pclive7.com):- चिंचवडमध्ये पार्क केलेली एक रुग्णवाहिका पाण्यात बुडाली आहे. यात कोणतीही जीवित हानी झाली नसून रुग्णवाहिकेचे मात्र मोठे नुकसान झाले आहे. चिंचवड मधील मोरया गोसावी मंदिरा शेजारी असलेल्या मैदानात ही घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चिंचवड येथील मोरया गोसावी मंदिरा शेजारी असलेल्या मैदानात काल एक रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराकरिता तेथे महापालिकेची एक रुग्णवाहिका उपलब्ध करण्यात आली होती. रात्रभर सुरू असलेल्या पावसामुळे अचानकपणे नदी पात्रातील पाणी वाढले आणि पार्क केलेली रुग्णवाहिका काही मिनिटात पाण्यात पूर्णपणे बुडाली आहे.























Join Our Whatsapp Group