दिवंगत कवी ना.धो. महानोर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ पिंपरी चिंचवड कल्चरल फाउंडेशनचा उपक्रम
पिंपरी (Pclive7.com):- भाजपा सांस्कृतिक प्रकोष्ठ पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा)आणि पिंपरी चिंचवड कल्चरल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने रविवारी (दि.१५) पिंपळे गुरव येथे ‘नभ उतरू आलं’ या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

दिवंगत जेष्ठ कवी ना धो महानोर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ पिंपळे गुरव येथील महानगरपालिकेच्या नटसम्राट निळू फुले नाट्यगृहात सायंकाळी ५ ते ८ या वेळेत हा कार्यक्रम संपन्न होणार असून यावेळी ना. धो. महानोर यांच्या कन्या सरला महानोर -शिंदे व हभप पुरुषोत्तम पाटील हे उपस्थित राहणार असल्याची माहिती फाउंडेशनचे अध्यक्ष विजयराव भिसे यांनी दिली.

याप्रसंगी विविध कविता व गाण्यांवर आधारित संगीतमय कार्यक्रमातून ना. धो. महानोर यांच्या आठवणींना उजाळा दिला जाणार असून या कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य असणार आहे.






















Join Our Whatsapp Group