लोकप्रतिनिधीच्या कामांना प्राधान्य द्यावे, अशी सूचना आयुक्तांना दिली. राहिलेली कामे जोमाने होतील, मेट्रोचे कामे लवकर कशी होतील, याकडे पाहिले पाहिजे. कायदा सुव्यवस्था चांगली राहिली पाहिजे. नागरिकांना मोकळेपणाने फिरता आले पाहिजे. कोणाकडूनही चुक होता कामा नये, दहशत, गुंडगिरी, दादागिरी खपवून घेतली जाणार नाही, अशा सूचना पोलीस आयुक्त यांना दिल्या आहेत. शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांची विचारसरणी अंगिकरून आपण समाजात वावरले पाहिजे. देशात पहिल्या क्रमांकाचे राज्य करत असताना सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे.
या कामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन झाले..
बोपखेल येथे मुळा नदीवर उभारण्यात आलेल्या पुलाच्या लोकार्पण, पोलीस आयुक्तालय यांच्या वतीने स्थायी आदेश पुस्तिकेचे प्रकाशन व नवीन शासकीय वाहनांना हिरवा झेंडा दाखविण्याचा कार्यक्रम होणार आहे. इंटिग्रेटेड कमांड कंट्रोल (आयसीसीसी)चे लोकार्पण, निगडी प्राधिकरण येथे हरित सेतू विषयक कामांचे लोकार्पण, पिंपळे सौदागर येथील पवना नदीवर उभारलेल्या पुलाचे लोकार्पण, रक्षक चौकात सांगवी फाटा ते किवळे रस्त्यावर भुयारी मार्ग (सबवे ) उभारण्याच्या कामाचे भूमिपूजन झाले. पिंपरी-चिंचवड महापालिका व पुणे महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने मुळा नदीकाठ सुधारणा प्रकल्प टप्पा एकचे शुभारंभ, मुळा नदीवर सांगवी ते बोपोडी दरम्यान उभारण्यात आलेल्या पुलाचे लोकार्पण झाले. पिंपरीत माता रमाई स्मारकाचे काम हाती घेण्याची सूचनाही पवार यांनी केली.