पिंपरी (Pclive7.com):- राज्याचे लक्ष लागलेल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा निकाल अखेर जाहीर झाला आहे. कारखान्यावर अजितदादा पवारांनी वर्चस्व मिळवलं असून त्यांच्या निळकंठेश्वर पॅनेलला 21 पैकी 20 जागा मिळवल्या. तर सहकार बचाव पॅनेलला एक जागा मिळवली. दुसरीकडे शरद पवारांच्या बळीराजा पॅनेलचा मात्र सुपडा साफ झाला.

माळेगांव सहकारी साखर कारखाना निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वातील निळकंठेश्वर पॅनल मधील उमेदवारांनी दणदणीत यश प्राप्त केल्याबद्दल आज मुंबई येथे पिंपरी चिंचवड मधील युवा नेते यश दत्ताकाका साने व माजी नगरसेवक पंकज भालेकर यांनी सदिच्छा भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले.






















Join Our Whatsapp Group