पिंपरी (Pclive7.com):- पवना धरण क्षेत्रात पुन्हा पावसाने जोर धरला आहे. धरण सध्या ७६.७५ एवढे भरले असून पाणीसाठ्यात वाढ होत आहे. त्या पार्श्वभूमीवर आज (दि.१५) सकाळी १० वाजता २६०० क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. तरी नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क रहावे असा इशारा प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे.

प्रशासनाने पवना नदी काठच्या सर्व नागरीकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे, प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आज (दि.१५) सकाळी १० वाजताच्या आकडेवारीनुसार पवना धरण सद्यस्थितीमध्ये ७६.७५ टक्के भरलेले आहे. पाणलोट क्षेत्रात पाऊस चालू असून धरणामध्ये येवा प्राप्त होत आहे. धरणातील पाणीसाठा नियंत्रित करण्या करिता सांडव्याद्वारे नदीपात्रामध्ये नियंत्रित पद्धतीने २६०० क्युसेक्स मुक्त विसर्ग चालू करण्यात आला आहे.

पाणलोट क्षेत्रातील पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानुसार धरणातून नदीपात्रात होणारा विसर्ग पुन्हा कमी किंवा जास्त केला जाऊ शकतो.

तरी पवना नदी काठच्या सर्व नागरीकांना सूचित करण्यात येते की, कोणीही नदीपात्रात उतरू नये. नदी मधील पाण्याचे पंप, नदी काठचे शेती अवजारे व तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास ती तात्काळ सुरक्षित ठिकाणी हलविण्यात यावीत. सखल भागातील संबंधित नागरिकांना सूचना देण्यात याव्यात, सर्वांनी योग्य ती खबरदारी व दक्षता घेत जलसंपदा विभागास व प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.






















Join Our Whatsapp Group