पिंपरी (Pclive7.com):- चिंचवड मधील चापेकर चौकात १२ दिवसांपूर्वी आकाश लांडगे या तरुणाचा खून करण्यात आला. त्याचा आज (दि.११) बाराव्या दिवसाचा विधी होता. त्याच्या आठवणीत एका मित्राने जेवत्या ताटावर स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. हा प्रकार कामशेत मधील राजवाडा हॉटेलमध्ये रविवारी रात्री दहाच्या सुमारास घडला. निहाल नाणेकर असे स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, निहाल त्याच्या दोन मित्रांसोबत कामशेत येथील राजवाडा हॉटेलमध्ये जेवणासाठी गेला होता. जेवण सुरू असताना त्यांच्यामध्ये आकाश लांडगे याचा विषय सुरू झाला. सोमवारी (दि.११) आकाशचा बारावा विधी आहे. अशी चर्चा झाल्यानंतर निहालला आकाशच्या खुनाचे दुःख सहन झाले नाही. निहालने स्वतःच्या कमरेला असलेल्या पिस्टल मधून स्वतःवर गोळी झाडली. ही गोळी त्याच्या डोक्याला लागली. यामध्ये निहाल गंभीर जखमी झाला. त्याला तात्काळ चिंचवड मधील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले, मात्र त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. निहालने मित्राच्या आठवणीतच हा प्रकार केल्याची चर्चा सध्या चिंचवड परिसरात सूरु आहे. याबाबत पोलिसांनी अधिकृत दुजोरा दिलेला नाही.
निहालचे वडील रिक्षा चालवतात. निहाल याच्यावर चिंचवड पोलीस ठाण्यात वाहनफोडीचा गुन्हा दाखल असल्याचे समजते. त्याचा चिंचवड गावातील घोलप गँगशी संबंध होता.
काय आहे रायबा उर्फ आकाश लांडगे प्रकरण ?
आकाश लांडगे हा देखील गुन्हेगारी पार्श्वभूमीचा होता. त्याची आणि रणजित बाबू चव्हाण या तरुणाची मागील काही दिवसांपूर्वी भांडणे झाले. त्या रागातून रणजित याने त्याच्या स्वप्नील ऊर्फ बाबा मोरे, सोन्या वराडे आणि प्रफुल्ल ढोकणे या मित्रांच्या मदतीने आकाशचा चाफेकर चौकात मंगळवार (दि.३०) रोजी आकाशला अडवून कोयता आणि रॉडने पायावर आणि कमरेच्या खाली मागील बाजूला वार केले. तसेच सिमेंटची कुंडी आकाशच्या डोक्यात मारली. यामध्ये आकाश गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात दाखल केले. मात्र त्याच्यावर उपचार सुरु असताना बुधवारी (दि. ३१) पहाटे तीनच्या सुमारास आकाशचा मृत्यू झाला होता. मयत आकाश देखील गुन्हेगार होता. त्याच्यावर भारतीय दंड संहिता कलम ३९५,४२७ प्रमाणे गुन्हा दाखल असून त्याबाबतचे दोषारोपपत्र पोलिसांनी न्यायालयात पाठविले आहे.
























Join Our Whatsapp Group