


भोसरी (Pclive7.com):- पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेल्या भोसरी येथील श्री भैरवनाथ दहीहंडी उत्सवाचे भव्य आयोजन दरवर्षीप्रमाणे करण्यात आले आहे. यावर्षी उत्सवाला प्रसिद्ध अभिनेत्री श्रुती हासन यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तसेच अभिनेत्री श्रीलीला आणि मिर्जापुर फेम अभिनेता दिव्येंदू शर्मा हे देखील या उत्सवाला हजेरी लावणार असल्याची माहिती श्री भैरवनाथ दहीहंडी उत्सवाचे अध्यक्ष योगेशभाऊ लांडगे यांनी दिली आहे.

भोसरी येथील पीएमटी चौकात शनिवार दि.१६ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजता हा भव्य दहीहंडी उत्सव संपन्न होणार आहे. भोसरी येथील मानाची दहीहंडी म्हणून श्री भैरवनाथ संस्थेची दहीहंडी प्रसिद्ध आहे. संस्थेचे अध्यक्ष योगेशभाऊ लांडगे यांच्यावतीने या उत्सवाचे आयोजन करण्यात येते. दरवर्षी अनेक सेलिब्रेटी या उत्सवाला हजेरी लावतात. यावर्षी प्रसिद्ध अभिनेत्री श्रुती हासन, अभिनेत्री श्रीलीला, आणि अभिनेता दिव्येंदू शर्मा यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

याप्रसंगी श्री भैरवनाथ आयोजित दहीहंडी उत्सवात न्यू मुंबा टीम कडून सुनील कुमार आणि परवेश कुमार आणि कोच अनिल छपराना यांचा सत्कार करण्यात येणार आहे. तसेच छत्रपती पुरस्कार विजेते गणेश नवले, विराज परदेशी, ऋषिकेश अरणकल्ले यांचा देखील सन्मान करण्यात येणार आहे. याप्रसंगी खोखो इंडिया टीमची कॅप्टन छत्रपती पुरस्कार विजेती प्रियंका इंगळे तिचा देखील सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती योगेशभाऊ लांडगे यांनी दिली.

श्री भैरवनाथ संस्थेच्या माध्यमातून योगेशभाऊ लांडगे यांच्या वतीने वर्षभर विविध सामाजिक कार्य करण्यात येते. गो शाळा चालवणे, कोरोना काळात मोफत लसीकरण, गरजूंना अन्नदान तसेच गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे मोफत वाटप असे विविध सामाजिक कार्य योगेशभाऊ लांडगे यांच्या पुढाकारातून राबविण्यात येतात.























Join Our Whatsapp Group