
पिंपरी (Pclive7.com):- आगामी पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीकरिता प्रभागातील आरक्षण सोडत काल संपन्न झाली. त्यानंतर कोणत्या प्रभागात कोणता आरक्षण हे चित्र स्पष्ट झालं असून इच्छुक उमेदवारांचे अर्ज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मागविण्याची प्रक्रिया दि.१४ नोव्हेंबर पासून सुरू करण्यात येत असल्याची माहिती राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष योगेश बहल यांनी दिली आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुक २०२५-२०२६ करिता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, पिंपरी चिंचवड शहर जिल्हाच्या वतीने ३२ प्रभागातील इच्छुक उमेदवारांनी शुक्रवार, दि.१४ नोव्हेंबर ते मंगळवार, दि.२५ नोव्हेंबर पर्यंत सकाळी १० ते सांयकाळी ०५ या वेळेत राष्ट्रवादी पक्ष कार्यालय, खराळवाडी, पिंपरी येथे संपूर्ण माहितीसह अर्ज पक्ष कार्यालयात जमा करावेत.

अर्जासोबत उमेदवारांनी आपली माहिती देताना अर्जदाराचे संपुर्ण नाव, विधानसभेचे नाव, प्रभागाचे नाव, प्रभाग क्रमांक, मतदार यादीतील भाग व अनुक्रमांक, आरक्षण प्रवर्ग (ओपन, ओबीसी, एस.सी.,एस.टी), जात वैधता प्रमाणपत्र छायांकित प्रत, जन्म दिनांक, वय, शिक्षण, आधार कार्ड, पक्षाचा क्रियाशील व प्राथमिक सदस्य क्रमांक इत्यादींसह आपला कार्य अहवाल जोडने आवश्यक आहे असे योगेश बहल यांनी म्हटले आहे.


























Join Our Whatsapp Group