
पिंपळे सौदागर (Pclive7.com):- महापालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्र. २८ रहाटणी–पिंपळे सौदागर येथील विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अधिकृत पॅनलच्या प्रचारार्थ रोझलँड रेसिडेन्सी सोसायटीत भव्य सभा पार पडली. या सभेला सोसायटीतील रहिवाशांचा मोठा प्रतिसाद लाभला.

यावेळी सोसायटीतील समिती सदस्य व रहिवाशांनी नाना काटे यांनी सोसायटीच्या स्थापनेपासून ते २०२५ पर्यंत सोसायटीसाठी केलेल्या कार्याचे आणि दिलेल्या सहकार्याचे विशेष कौतुक केले. सोसायटीच्या कामांव्यतिरिक्त वैयक्तिक पातळीवरही त्यांनी अनेकांना मदत केल्याचे सांगत, “नाना काटे हे आमच्या कुटुंबातील सदस्यासारखे आहेत,” अशा भावना रहिवाशांनी व्यक्त केल्या.

सभेदरम्यान सोसायटीतील आजी-माजी समिती सदस्य व रहिवाशांनी एकमताने येऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीत नाना काटे यांच्या नेतृत्वाखालील प्रभाग क्र.२८ मधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पॅनलमधील सर्व उमेदवारांना जाहीर पाठिंबा जाहीर केला. तसेच दि. १५ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या मतदानात सोसायटीतील सर्व मतदारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवारांना मतदान करावे, असे आवाहनही करण्यात आले.

या सभेस रोझलँड रेसिडेन्सी सोसायटीचे चेअरमन महेश चौधरी, सेक्रेटरी, खजिनदार, समिती सदस्य, आजी-माजी सदस्य व रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार विठ्ठल उर्फ नाना काटे, मीनाक्षीताई अनिल काटे, शीतलताई नाना काटे आणि सायलीताई उमेश काटे यांची प्रमुख उपस्थिती होती.






















Join Our Whatsapp Group