पिंपरी (Pclive7.com):- दिवसेंदिवस पर्यावरणाचा समतोल बिघडत आहे. पर्यावरणाच्या बिघडलेल्या समतोलामुळे अनियमित व अपूर्ण पर्जन्यमान, भयानक उष्णता अशा संकटांना तोंड देणे भाग पडत आहे. यावर प्रभावीपणे मात करायची असल्यास काळाची गरज ओळखून मोठय़ा प्रमाणावर वृक्षारोपण व त्याचे संवर्धन करणे व पर्यावरणाचा समतोल राखणे प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. असे मत पिंपरी चिंचवड महापालिकेचे सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी व्यक्त केले.
केंद्र सरकार, राज्य सरकार आणि पिंपरी चिंचवड महापालिकेच्या संयुक्त विध्यमाने प्रभाग क्रमांक ११ मधील सीडीसी – १, २ आणि ३ या मोकळ्या मैदानाच्या आवारात २१०० झाडांची रोपे लावण्यात आली, त्या वेळी पक्षनेते पवार बोलत होते.
महापालिकेचे सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समितीचे सभापती संजय नेवाळे, नगरसेविका योगिता नागरगोजे, अश्विनी बोबडे, सामाजिक कार्यक्रते सचिन काळभोर, गोरख पाटील, नागेश शेट्टी, महापालिकेचे कार्यकारी अभियंता संजय कांबळे, उपअभियंता विजय कांबळे, कनिष्ठ अभियंता प्राजक्ता गव्हाने आदी या वेळी उपस्थित होते.
सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार म्हणाले कि, पर्यावरणावर दररोज हजारो वाहनांमधून सोडण्यात येणारा कार्बनडॉक्साइड वायूचाही परिणाम होत आहे. तापमान रोखण्यासाठी वृक्षलागवड करून वातावरणातील समतोल राखणे गरजेचे आहे.





















Join Our Whatsapp Group