पिंपरी (Pclive7.com):- शहरातील पवना, इंद्रायणी व मुळा नदीपात्रातील तरंगता कचरा स्वच्छ करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने ‘फ्लाटिंग वॉटर ड्रोन’ची मदत घेतली आहे. गणेशोत्सवात प्रायोगित तत्त्वावर पवना व इंद्रायणी नदीवरील विसर्जन घाटावर त्याचा वापर करण्यात येणार आहे.
या ४० किलो वजनाच्या ड्रोनद्वारे नदीपात्रात तरंगणारे प्लास्टिक, हार, फुले, तरंगते वनस्पती, थर्माकोल आदी कचरा काढता येतो. सदर ड्रोन नदी काठावरील व्यक्तींद्वारे रिमोट कंट्रोलद्वारे नियंत्रित केले जाते. एका वेळी तब्बल ३५० किलो वजनाचा कचरा संकलन ड्रोनद्वारे केले जाते. जमा झालेला कचरा नदी काठावर आणून काढून घेतला जातो. पुन्हा हे ड्रोन पाण्यात सोडून स्वच्छता करता येते.
पवना नदीपात्रात या ड्रोनची चाचणी घेण्यात आली. या वेळी महापौर राहुल जाधव, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे, पर्यावरण विभागाचे कार्यकारी अभियंता संजय कुलकर्णी, क्षेत्रीय अधिकारी संजय खोत व आरोग्य विभागाचे कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.






















Join Our Whatsapp Group