पिंपरी (Pclive7.com):-
पिंपरी विधानसभा संघटकपदी सरिता साने आणि चिंचवड विधानसभा संघटकपदी अनिता तुतारे यांची निवड करण्यात आली आहे. काळभोर या मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या समर्थक आहेत. फेब्रुवारी २०१७ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीवेळी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यांनी शिवसेनेकडून काळभोरनगर प्रभागातून पालिकेची निवडणूक लढविली होती. परंतु, काही मतांअभावी त्यांचा पराभव झाला होता.
जिल्हा संघटकपदी निवड करण्यात आलेल्या शादान चौधरी यांच्याकडे मावळ, पिंपरी आणि चिंचवडची जबाबदारी असणार आहे. चौधरी या लोणावळा नगरपरिषदेत विरोधी पक्षनेत्या आहेत. खासदार बारणे यांच्या त्या कट्टर समर्थक म्हणून ओळखल्या जातात. खासदार श्रीरंग बारणे यांनी पिंपरी-चिंचवड शिवसेनेच्या शहर प्रमुखपदी योगेश बाबर, जिल्हा प्रमुखपदी गजानन चिंचवडे या आपल्या समर्थकांची वर्णी लावली. बारणे यांनी मावळचा गड राखण्याची जोरदार तयारी सुरू केली असून पक्ष संघटना मजबूत करण्यावर जोर दिला आहे.






















Join Our Whatsapp Group