पिंपरी (Pclive7.com):- निगडी प्राधिकरण येथे नगरसेवक अमित गावडे व श्री समर्थ युवक प्रतिष्ठाणच्यावतीने आदिशक्ती-स्त्रीशक्ती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. निगडी प्राधिकरण येथील से. २६, छत्रपती शिवाजी महाराज जलतरण तलावाशेजारील, हेडगेवार भवनाच्या प्रांगणात हा महोत्सव रंगणार आहे.
प्रत्येक स्त्रीमध्ये एक आदिशक्ती असते, तिला या नवरात्रीनिमित्त वंदन करण्यासाठी, तिच्यातल्या विविध कलागुणांच्या शक्तीला अभिवादन करण्यासाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, या महोत्सवाचा उद्घाटन समारंभ बुधवार दिनांक १० रोजी घटस्थापनेच्या दिवशी मान्यवरांच्या हस्ते होणार असल्याची माहिती नगरसेवक अमित गावडे यांनी दिली.
महोत्सवा दरम्यान विविध कलागुणांना वाव मिळावा याकरिता प्रतिष्ठानच्या माध्यमातून नऊ दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे यात दांडिया स्पर्धा, विविध खेळ व विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यात आदिशाक्तीला अभिवादन, भजनी मंडळाचे सादरीकरण, आदिशक्तीची विविध रूपे, विविध गुणदर्शन, महिलामंडळ पाककला स्पर्धा, विषय उपवासाचे पदार्थ, अन्नपूर्णा अभिवादन, गंमत जंमत, गेम शो व चैताली माजगावकर-भंडारी यांचा महाभोंडला, भव्य रांगोळी स्पर्धा, दांडिया व रावण दहनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
सहभाग नोंदवण्यासाठी नगरसेवक अमित गावडे यांचे जनसंपर्क कार्यालय, आकुर्डी पोलिस चौकी जवळ, हॉटेल रागाच्या मागे किंवा ०२०-२७६५५५५०, ९७६७५७७७९९ या दूरध्वनी क्रमांकावरती नाव नोंदणीचे आवाहन संयोजक यांच्यामार्फत करण्यात आले आहे.






















Join Our Whatsapp Group