पिंपरी (Pclive7.com):- उजनी जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रात मासेमारीसाठी गेलेल्या तीन मच्छिमारांना तब्बल ४२ किलो वजनाचा कटला मासा सापडला आहे. या जलाशया अलीकडेच्या काळात सापडलेला हा सर्वात मोठा कटला मासा आहे.
हा मासा बारामतीचे मासे व्यापारी शंकर मोरे यांनी १३० रूपये दराने खरेदी केला. जवळपास साडेपाच हजार रुपयात हा एक मासा खरेदी झाला.
भिगवण मासळी बाजारातील आडतदार भगवान महाडिक यांच्या आडतीवर आलेला हा मासा पाहण्यासाठी एकच गर्दी झाली होती. उजणीत पुर्वी ५० किलोपासून शंभर किलो वजनाचे कटला जातींचे मासे सापडत मात्र अलिकडे सर्वच जातींच्या माशांचे उत्पादन घटले आहे. त्यामुळे अलिकडच्या वीस वर्षातील सर्वांत जास्त वजनाचा आजचा मासा ठरला आहे.






















Join Our Whatsapp Group