पिंपरी (Pclive7.com):- भोसरीतील कै.अंकुशराव लांडगे सभागृहाचा परिसर आणि राजमाता जिजाऊ उड्डाणपुलाच्या खाली असलेले अतिक्रमण काढण्यासाठी महापालिका मोठ्या पोलीस बंदोबस्तात उद्या (दि.२६) कारवाई करणार आहे. भोसरीतील अतिक्रमणे काढावी अशी मागणी शिरूरचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली होती. त्यात महापालिकाच अनधिकृत टपऱ्या आणि हातगाड्यांना संरक्षण देत असल्याचा आरोप केला होता. अखेर महापालिकेने खासदार आढळराव पाटील यांच्या मागणीनुसार कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. या कारवाईसाठी महापालिकेने पोलीस आयुक्तांना कळवले असून मोठा पोलीस बंदोबस्त मागविला आहे. उद्या (दि.२६) रोजी सकाळपासून ही कारवाई सुरू होणार आहे.
भोसरीतील अतिक्रमणांवर उद्या पोलीस फौजफाट्यासह पालिकेची कारवाई
![भोसरीतील अतिक्रमणांवर उद्या पोलीस फौजफाट्यासह पालिकेची कारवाई](https://pclive7.com/wp-content/uploads/2018/10/IMG_20180906_212707.jpg)