पिंपरी (Pclive7.com):- क्रिकेटच्या सामन्यांवर सट्टा लावणार्यांवर पिंपरी पोलीसांनी कारवाई केली. पाकिस्तान विरूध्द ऑस्टेलिया यांच्यातील टी २० सामन्यावर सट्टा घेत असताना वैभवनगर येथील आरोपींच्या राहत्या घरी रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली. (राम गोवर्धन बजाज, वय ४४ रा. वैभवनगर पिंपरी), (गोविंद प्रभुदास ललवानी, वय ४१, रा. वैष्णवीदेवी मंदीरा जवळ, पिंपरी) अशी अटक करण्यात आलेल्या सट्टेबाजांची नावे आहेत.
या कारवाईक त्यांच्याकडून एलईडी टिव्ही, सेट ऑफ बॉक्स, १६ मोबाईल हँन्डसेट, वही, पेन्सिल, प्लँस्टिक टेबल, टेबल कव्हर, इलेक्ट्रीक वायर, व्हाईस रेकॉर्डर, मोबाईल चार्जिंग हब, मोबाईल चार्जिंग बॉक्स, लँपटॉप व चार्जर, रोख रक्कम असा एकूण २ लाख २३ ७१६ रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस उपनिरिक्षक व्ही.बी. बढे पुढील तपास करत आहेत.






















Join Our Whatsapp Group