पिंपरी (Pclive7.com):- सामाजिक न्याय विभागाचा राष्ट्रीय दिव्यांगजन पुरस्कार उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू व केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड महापालिकेला मिळाला. नवी दिल्ली येथे आयोजित कार्यक्रमात महापौर राहुल जाधव आणि मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण यांनी हा पुरस्कार स्विकारला.
केंद्र शासनाच्या डिसअँबेलिटीसाठीच्या मार्गदर्शक तत्वानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांनी तयार केलेली संकेतस्थळे (वेबसाईट) दिव्यांग व्यक्तींना वापरण्याच्या दृष्टीने परिपुर्ण करणेबाबत महाराष्ट्र शासनामार्फत कळविणेत आलेले होते. त्यानुसार पिंपरी चिंचवड महापालिकेचे संकेतस्थळ (www.pcmcindia.gov.in) दिव्यांग्य व्यक्तिंना हाताळण्याच्या दृष्टीने परिपूर्ण करणेसाठी सदर मार्गदर्शक सुचनांचा महापालिका स्तरावर अभ्यास करणेत येऊन महापालिकेचे संकेतस्थळ दिव्यांग व्यक्तिंना वापरणेचे दृष्टीने परिपूर्ण करण्यात आलेले आहे. सदर संकेतस्थळाचे “Website Accessibility Audit” करुन घेणेत येऊन त्याची पुर्तता करण्यात आलेली आहे. सध्यस्थितीत पिंपरी चिंचवड महापालिकेचे संकेतस्थळ सर्व प्रकारच्या दिव्यांग व्यक्तींना वापरणेच्या दृष्टीने परिपुर्ण करण्यात आलेला आहे.
पिंपरी चिचवड महापालिकेचे संकेतस्थळ (www.pcmcindia.gov.in) “दिव्यांग व्यक्तिंना हाताळण्यास उत्कृष्ट संकेतस्थळ” याकरीता राष्ट्रीय पुरस्कार २०१८ साठी केंद्रशासनाचे दिव्यांग व्यक्तींचे सक्षमीकरण विभाग, सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालय, नवी दिल्ली येथे दिनांक २९ ऑगस्ट २०१८ रोजी प्रस्ताव पाठविण्यात आलेला होता. त्यानुसार केंद्रशासनाच्या दिव्यांग व्यक्तींचे सक्षमीकरण विभाग यांनी दिनांक ६ नोव्हेंबर २०१८ चे पत्रान्वये पिंपरी चिंचवड महापालिकेचे संकेतस्थळास दिव्यांग पूरक संकेतस्थळ निर्मीती “Best Accessible Website National Award” साठी निवड झाल्याबाबत कळविणेत आलेले होते. अशा प्रकारचे पारितोषिक मिळविणारी पिंपरी चिंचवड महापालिका ही पहिली स्थानिक स्वराज्य संस्था असून सदर पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम उपराष्ट्रपती व्यैकय्या नायडू यांच्या हस्ते तसेच सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री थावरचंद गेहलोत, सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री विजय सांपला, सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री क्रिशन पाल गुर्जर, सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत आज जागतिक अपंगदिनी विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे संपन्न झाला. हा पुरस्कार महापौर राहुल जाधव आणि मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण यांनी हा स्विकारला.






















Join Our Whatsapp Group