पिंपरी (Pclive7.com):- कला, साहित्य आणि संस्कृतीच्या संवर्धनासाठी सातत्याने कार्यशील असलेल्या पिंपरी-चिंचवडमधील नामांकित ‘कलारंग’ सांस्कृतिक कला संस्थेच्या वतीने एका विशेष गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत ‘साहित्य संवर्धन’ व ‘परिवर्तन उत्कर्ष’ आघाडीच्या माध्यमातून दैदिप्यमान विजय मिळवून १ एप्रिल रोजी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारणाऱ्या सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा जाहीर सत्कार आमदार अमित गोरखे यांच्या पुढाकारातून व कलारंग संस्थेच्या वतीने करण्यात येणार आहे.

हा भव्य ‘सारस्वतांचा गौरव सोहळा’ येत्या शुक्रवार, ३ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ५:३० वाजता, ग. दि. माडगूळकर नाट्यगृह, प्राधिकरण, निगडी येथे संपन्न होणार आहे.
या सोहळ्याला ज्येष्ठ समाजसेवक पद्मश्री गिरीशजी प्रभुणे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असून, त्यांच्या शुभहस्ते सत्कारमूर्तींचा सन्मान केला जाईल. यामध्ये महाराष्ट्र साहित्य परिषदेचे नवनियुक्त अध्यक्ष मा. श्री. योगेशजी सोमण, प्रमुख कार्यवाह मा. स्वातीताई महाळंक, आणि कोषाध्यक्ष मा. श्री. प्रदीप निफाडकर यांच्यासह संपूर्ण नवनियुक्त कार्यकारिणीचा गौरव करण्यात येणार आहे. तर निवेदन श्री.रविंद्र खरे करणार आहेत.

‘कलारंग’ सांस्कृतिक कला संस्थेच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात उपस्थित राहून आपण या सोहळ्याची शोभा वाढवावी, अशी नम्र विनंती निमंत्रक तथा ‘कलारंग’ चे अध्यक्ष आमदार अमित गोरखे, उपाध्यक्ष श्री. शैलेश लेले आणि समस्त संयोजन समितीच्या वतीने करण्यात आली आहे.




















Join Our Whatsapp Group