पिंपरी (Pclive7.com):- हिंजवडी पोलीस ठाण्याच्या पथकाने अंमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई करत एमडी (मेफेड्रोन) ड्रग्जसह दोन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत सुमारे २४२ ग्रॅम एमडी अंमली पदार्थ तसेच इतर २७ लाख ५५ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी अतुल शंकर बालगुडे (वय ३५, पाथरगाव ता. मावळ) आणि शारुख उर्फ सद्दाम इकबाल अन्सारी (रा. गोवंडी मुंबई) यांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंजवडी परिसरात अंमली पदार्थांची विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर सापळा रचण्यात आला. त्यानुसार संशयितांना ताब्यात घेऊन तपास केला असता त्यांच्या जवळून एमडी ड्रग्ज आढळून आले. या प्रकरणी संबंधित आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या कारवाई दरम्यान पोलिसांनी सुमारे २४२ ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त केले असून, आरोपींकडून रोख रक्कम व इतर साहित्यासह २७ लाख ५५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींना न्यायालयात हजर करण्यात येणार असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ पांचाळ हे करीत आहेत.
ही कारवाई हिंजवडी पोलीस स्टेशनचे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) ऋषीकेश घाडगे, तपास पथकाचे प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ पांचाळ, सहायक पोलीस निरीक्षक दुर्गानाथ साळी, श्रेणी पोलीस उप निरीक्षक अशोक दुधवणे, पोलीस अंमलदार, नरेश बलसाने, चिंतामणी जोशी, कैलास केंगले, संदीप मासाळ, विजय गेंगजे, प्रशांत गिलबिले, कबीर पिंजारी, कारभारी पालवे, ओमप्रकाश कांबळे, विशाल भोईर, अरुण पारधी यांनी केली आहे



















Join Our Whatsapp Group