पिंपरी (Pclive7.com):- पिंपळे सौदागर येथे स्मशान भूमीच्या कामाची महापौर राहुल जाधव व नगरसेवक नाना काटे यांनी पाहणी केली. ही स्मशानभूमी बांधण्यासाठी महापालिकेने दि.१६ सप्टेंबर २०११ रोजी मंजुरी दिली. ३ जानेवारी २०१२ रोजी वर्क ऑर्डर देण्यात आली होती. या स्मशानभूमीच्या कामात अम्फीथीएटर, दशक्रिया विधी हॉल, पिंडदान व्यवस्था, ८० मीटर लांब व ८ मीटर रुंद घाट, स्वच्छता गृह, पार्किंग, वाचमन रूम, कंपाउंड वाल, गेट, कमान आदी कामाचा समावेश आहे. तसेच या ठिकाणी विद्युत दाहिनी उभारण्यात येणार आहे. त्यासाठी जागा ठेवलेली आहे. या कामापैकी मागील भिंत आणि कमानीचे काम व इतर अनुषंगिक काम पूर्ण करण्याच्या सूचना महापौर राहुल जाधव आणि नगरसेवक नाना काटे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
पिंपळे सौदागर येथील स्मशानभूमीची महापौरांकडून पाहणी
यावेळी ‘ड’ क्षेत्रिय अधिकारी खरोटे साहेब, कार्यकारी अभियंता गट्टूवार, उप अभियंता सुनिल पाटील, कनिष्ठ अभियंता नरेश जाधव प्रशासन अधिकारी बहुरे, सहा.आरोग्य अधिकारी बेंडाळे, गायकवाड, आरोग्य निरीक्षक राकेश सौदाई आदि उपस्थित होते.





















Join Our Whatsapp Group