पिंपरी (Pclive7.com):- रावेत प्रभाग क्रमांक १६ मधील साईनगर फॉरेस्ट रोड परिसराचा विकास आणि पर्यावरण संवर्धनासाठी महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले असून, येथे लवकरच ‘ऑक्सिजन पार्क’ विकसित करण्याची तयारी सुरू झाली आहे. शिवसेना नगरसेविका ऐश्वर्या राजेंद्र तरस यांनी याकरिता सातत्याने पाठपुरावा केला आहे. यासंदर्भात आज वनपरिक्षेत्र अधिकारी (फॉरेस्ट ऑफिसर) भांबुर्डा तथा सदस्य सचिव नागरी संयुक्त वन व्यवस्थापन समिती, पुणे यांच्या समवेत सकारात्मक बैठक पार पडली.

या बैठकीत साईनगर फॉरेस्ट परिसरातील महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने विविध उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. विशेषतः फॉरेस्ट रोड परिसरात स्ट्रीट लाईट पोल बसविणे, नागरिकांसाठी सुरक्षित पायवाटा तयार करणे तसेच भविष्यात विविध नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत अधिकाऱ्यांनी सकारात्मक आश्वासन दिले.

या उपक्रमामुळे साईनगर परिसरातील नागरिकांना हरित व सुरक्षित वातावरण मिळण्यास मदत होणार असून, परिसराचे सौंदर्यीकरण आणि पर्यावरण संरक्षणालाही चालना मिळणार आहे. नगरसेविका ऐश्वर्या राजेंद्र तरस यांनी सांगितले की, “साईनगर परिसराचा विकास, महिलांची सुरक्षितता आणि पर्यावरण संवर्धनासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू राहणार आहे.”




















Join Our Whatsapp Group