पिंपरी (Pclive7.com):- चिखली परिसरात भटक्या कुत्र्यांना खाऊ घालण्याच्या कारणावरून एका महिलेला लोखंडी रॉडने मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी चिखली पोलिसांनी दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल करून दोघांनाही अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना मंगळवारी (दि.२० मे) मध्यरात्री १२.०५ वाजण्याच्या सुमारास संतपीठ रोड, पाटीलनगर, चिखली येथे घडली. महिला फिर्यादी या परिसरात भटक्या कुत्र्यांना बिस्कीट आणि चिकन-राईस खाऊ घालत होत्या. त्यावेळी परिसरात राहणाऱ्या जयश्री भोसले (वय ३५) आणि त्यांचे पती रामदास भोसले यांनी “येथे कुत्र्यांना काही खायला टाकू नको” असे म्हणत फिर्यादीसोबत वाद घातला.

वाद वाढल्यानंतर रामदास भोसले यांनी फिर्यादीच्या हातातील लोखंडी रॉड हिसकावून घेत त्यांच्या हातावर आणि पायावर मारहाण केल्याचा आरोप आहे. तसेच जयश्री भोसले यांनीही फिर्यादीला हाताने मारहाण करत शिवीगाळ केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी चिखली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार पेटकर करत आहेत.





















Join Our Whatsapp Group