पिंपरी (Pclive7.com):- कुदळवाडी परिसरातील कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने ग्रामस्थ, घरमालक आणि पोलिस प्रशासनाची संयुक्त महत्वपूर्ण बैठक विठ्ठल मंदिर, कुदळवाडी येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. बैठकीला परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.

या बैठकीस चिखली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल साळुंखे प्रमुख उपस्थित होते. त्यांनी नागरिकांशी संवाद साधत परिसरातील शांतता आणि सुरक्षिततेसाठी पोलिस प्रशासन कायम तत्पर असल्याचे सांगितले. तसेच प्रत्येक घरमालकाने आपल्या भाडेकरूंची संपूर्ण माहिती पोलिसांकडे नोंदविणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले.

या बैठकीत वाढती लोकसंख्या, बाहेरून येणाऱ्या नागरिकांची पडताळणी, संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवणे, सीसीटीव्ही यंत्रणेचा प्रभावी वापर, महिला व ज्येष्ठ नागरिकांची सुरक्षा, वाहतूक समस्या तसेच सामाजिक सलोखा कायम राखण्यासाठी नागरिकांनी पोलिस प्रशासनाला सहकार्य करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल साळुंखे यांनी नागरिकांच्या अडचणी व समस्या जाणून घेत त्यावर योग्य तो समन्वय साधण्याचे आश्वासन दिले. परिसर गुन्हेमुक्त आणि सुरक्षित ठेवण्यासाठी नागरिक व पोलिस प्रशासन यांच्यातील समन्वय अत्यंत महत्त्वाचा असल्याचे त्यांनी नमूद केले.
बैठकीस परिसरातील अनेक घरमालक, व्यापारी, युवक, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. नागरिकांनीही विविध समस्या मांडत पोलिस प्रशासनाच्या या उपक्रमाचे स्वागत केले आणि भविष्यातही पूर्ण सहकार्य करण्याची भूमिका व्यक्त केली. कुदळवाडी परिसर सुरक्षित, शांततामय आणि गुन्हेमुक्त ठेवण्यासाठी अशा बैठका नियमितपणे आयोजित करण्याची मागणी नागरिकांनी यावेळी केली.

या बैठकीस रमेश मोरे, दिनेश यादव, किशोर बालघरे, गुलाब मोरे, बाळासाहेब मोरे, उत्तम बालघरे, दिपक ठाकुर, अनिल यादव, विशाल बालघरे, दत्तात्रय हरगुडे, विजयराज यादव, दादा मोरे, निखील मोरे, अमोल बालघरे, बापू होले, गणेश बालघरे, निलेश यादव, तानाजी मालुसरे, संदीप पवार, ज्ञानेश्वर आरुडे, प्रतीक मोरे, योगेश यादव, अमित बालघरे, विशाल बनसोडे, सोमनाथ यादव, दिपक घन, विकास यादव, सागर बालघरे, आकाश किवळे, दिनेश मोरे, किरण यादव, गणेश यादव, लक्ष्मण सगळे, नन्न्या बांदल, गणेश मोरे आणि हर्षवर्धन मोरे आदी भूमिपुत्र उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांचे आभार नगरसदस्य तथा भाजपा युवा मोर्चा पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष दिनेश लालचंद यादव यांनी मानले.




















Join Our Whatsapp Group