पिंपरी (Pclive7.com):- शिवसेना मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, संसदरत्न खासदार श्रीकांत शिंदे तसेच युवासेना प्रमुख पूर्वेस सरनाईक यांच्या कामाने प्रभावित होऊन पिंपरी-चिंचवडमधील अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेना व युवासेनामध्ये जाहीर प्रवेश केला.

मावळचे खासदार श्रीरंग बारणे आणि शिवसेना उपनेत्या व नगरसेविका सुलभाताई रामभाऊ उबाळे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी युवानेते अजिंक्य दादा उबाळे, युवासेना शिरूर लोकसभा अध्यक्ष, युवासेना भोसरी विधानसभा संपर्कप्रमुख, महेश डोके (शिवसेना शाखाप्रमुख), अमित शिंदे (युवासेना पुणे जिल्हा चिटणीस) आदी मान्यवर उपस्थित होते.

अनिश काळभोर (पिंपरी विधानसभा अध्यक्ष) व चांद पटेल (विभाग प्रमुख) यांच्या पुढाकाराने हा प्रवेश कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी मूज्जमील भाई शेख (पिंपरी-चिंचवड शहर उपाध्यक्ष), शाकीर भाई पठाण, अजहर सय्यद, अमीर नदाफ, इम्तियाज पटेल, सैफ अली खान, रिजवान शेख तसेच इतर अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेना व युवासेनामध्ये प्रवेश करून पक्ष बळकट करण्याचा निर्धार व्यक्त केला.





















Join Our Whatsapp Group