पिंपरी (Pclive7.com):- शिवसेनेच्या पदाचा, लेटरहेडचा गैरवापर करून नागरिकांना जाणीवपूर्वक त्रास दिल्यास पक्षातून हकालपट्टी करण्याचा इशारा शिवसेना उपनेते, खासदार श्रीरंग बारणे यांनी पदाधिकाऱ्यांना दिला आहे.

खासदार बारणे म्हणाले, राज्याचे उपमुख्यमंत्री, शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे हे चोवीस तास काम करीत आहेत. त्यांच्यावर राज्यातील जनतेचा मोठा विश्वास आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी जबाबदारीने वागणे आवश्यक आहे. काही पदाधिकारी पदाचा, पक्षाचे चिन्ह असलेल्या लेटरहेडचा गैरवापर करतात.

लेटरहेडवरुन पत्रे देऊन, माहितीचा अधिकार वापरून नागरिकांना त्रास देण्याच्या हेतूने अधिकाऱ्यांना पत्रे दिली जात आहेत. याबाबत काही तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांनी पदाचा गैरवापर करू नये.

शिवसेनेचा कोणता कार्यकर्ता नागरिकांना जाणीवपूर्वक त्रास देत असेल तर त्यांनी माझ्याशी संपर्क साधावा. अशा कार्यकर्त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात येईल. पदाचा गैरवापर करणाऱ्यांची यापूर्वी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.
– श्रीरंग आप्पा बारणे, खासदार मावळ.




















Join Our Whatsapp Group