पिंपरी (Pclive7.com):- मागील काही दिवसात पेट्रोल डिझेलच्या किमतीत तसेच सीएनजी च्या किमतीत झालेल्या दरवाढीच्या निषेधार्थ आज पिंपरी चिंचवड काँग्रेस कडून लक्षवेधी आंदोलन तहसीलदार कार्यालयाजवळ करण्यात आले.

याप्रसंगी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सिलेंडर, पेट्रोल, डिझेल सीएनजी आणि शेती उत्पादने या प्रतिमा असलेले फ्लेक्स पोशाख परिधान करून तहसीलदार कार्यालयात प्रवेश केला आणि दरवाढ मागे घेण्याच्या संदर्भात तहसीलदार द्वारा पंतप्रधान असे निवेदन देण्यात आले.
याबाबत माहिती देताना नरेंद्र बनसोडे यांनी सांगितले, “मागील काही दिवसात पेट्रोल डिझेल सीएनजी च्या दरामध्ये प्रति लिटर मोठी दरवाढ करण्यात आलेली आहे, वास्तविक पाहता कच्च्या तेलाचे आजचे दर पाहता पेट्रोल डिझेलच्या किमती त्या अनुषंगाने सरकारकडून घेतल्या जात नसून मागील बारा वर्षात केंद्र सरकारने पेट्रोल उत्पादनावर कर आणि उत्पादन शुल्कच्या माध्यमातून जनतेच्या खिशातून 43 लाख कोटी नफा कमवला आहे तसेच मागील चार-पाच दिवसात केलेल्या दरवाढीतून भारत पेट्रोलियम, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, आणि हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन या कंपन्यांनी 12,400 कोटीची कमाई काहीच तासात केली आहे हा सरळ सरळ जनतेच्या खिशावर घातलेला दरोडा आहे, पेट्रोल डिझेलच्या किमती वाढल्याने त्याचा मोठ्या परिणाम सर्वसामान्य जनतेवर होतो फक्त इंधनच माग होत नाही तर जीवन आवश्यक वस्तू सहित सर्व प्रकारची महागाई निर्माण होते उत्पन्न वाढत नाही मात्र महागाई वाढत असल्याने सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले शेतीची कामे खोळंबलेली आहेत, शेतीची कामे वेळेस झाली नाही तर अन्नधान्य उत्पादनावर परिणाम होऊन पुन्हा महागाई वाढेल हे दृष्टचक्र थांबवणे गरजेचे आहे, सरकारने जनतेला दिलासा देण्यासाठी तात्काळ पेट्रोल डिझेलचा पुरवठा सुरळीत करावा तात्काळ दरवाढ मागे घ्यावी यासाठी हे लक्षवेधक स्वरूपाचे आंदोलन करत तहसीलदार यांना निवेदन दिले आहे”.

तहसीलदार कार्यालय जवळच परिसरामध्ये याप्रसंगी घोषणेबाजी करत दरवाढ मागे घेण्याच्या बाबतीमध्ये केंद्र सरकारच्या निषेधार्थ घोषणा देण्यात आल्या.
याप्रसंगी काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे, शिक्षण मंडळाचे माजी सभापती अभिमन्यू दहीतुले, युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव स्वप्निल बनसोडे, काँग्रेस सेवा दलाचे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष पांडुरंग जगताप, उमेश बनसोडे, काँग्रेसचे माजी सरचिटणीस हरीश डोळस, हिराचंद जाधव, जितेंद्र छाबडा, अनुसूचित जाती विभागाचे माजी अध्यक्ष विजय ओव्हाळ, कुणाल भोसले, प्रद्युम्न चव्हाण, सिद्धार्थ कांबळे, प्रवीण कांबळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.




















Join Our Whatsapp Group