पिंपरी (Pclive7.com):- विषारी दारू प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. योगेश वानखेडेने अवघ्या 6 हजार 600 रुपयांसाठी 18 जणांचा जीव घेतला आहे. मिथेनॉल आणि दारू खरेदी करण्यासाठी योगेशने केलेला खर्च आणि त्याने मिथेनॉल मिक्स करुन विक्री केलेली दारू यातील फरक काढला तर 6 हजार 600 रुपयांचा येतो. कसा ते पाहुयात

योगेश वानखेडेने 6600 रुपयांसाठी 18 जणांचा जीव घेतला..
– योगेश वानखेडेने 210 लिटर मिथेनॉल खरेदी केलं – 17500 रुपये मोजले
– 9 मे ला ही खरेदी केली
– 23 मे ला मिथेनॉलचा प्रयोग करायचं ठरवलं
– मग 35 लिटर चे 1 ड्रम – 1900 रुपये
– याप्रमाणे 5 ड्रम – 9500 रुपयांची खरेदी केली
– 5 ड्रममध्ये 5 ड्रम पाणी मिस्क केले आणि 10 ड्रम बनवले
– या 10 ड्रममध्ये निम्म्याहून अधिक मिथेनॉल मिक्स केलं आणि त्याचे 12 ड्रम बनवले
– मिथेनॉल 17500 + 5 ड्रम दारुचे 9500 = एकूण 27000 रुपये खर्च
– प्रति ड्रम 2800 रुपये प्रमाणे 12 ड्रमची विक्री केली
– यातून 33 हजार 600 रुपये मिळाले
– खरेदीसाठी झालेला खर्च आणि विक्रीतून मिळालेले पैसे यातील फरक
– 33600 – 27500 = 6 हजार 600 रुपयांचा फायदा झाला.

विषारी दारू प्रकरणात योगेश वानखेडे, कर्नलसिंग विरखा, गुरुमित सिंग विरखा आणि राधेश्याम प्रजापती याला अटक करण्यात आली असून ८ जून पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.




















Join Our Whatsapp Group