पिंपरी (Pclive7.com):- परदेशी शेअर मार्केट, स्टॉक मार्केट व बिटकॉइनमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीची तब्बल ८८ लाख २६ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली.

याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका लिंकधारकासह समृद्धी, प्रथम पटेल आणि विविध बँकांच्या २० खातेधारकांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी सुरुवातीला गुंतवणुकीवर मोठा नफा दाखवून विश्वास संपादन केला. नंतर नफा काढण्यासाठी कन्व्हर्जन फी, कॅपिटल गेन टॅक्स, सेबी शुल्क, जीएसटी आदी कारणे सांगत वेळोवेळी पैसे भरायला लावले. एकूण ८८ लाख २६ हजार ३४२ रुपये उकळूनही रक्कम परत न केल्याने फसवणूक झाल्याचे उघड झाले. सायबर पोलिस तपास करीत आहेत.




















Join Our Whatsapp Group