पिंपरी (Pclive7.com):- मोशी कचरा डेपो परिसरातील दुर्घटनाग्रस्त इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या कर्मचाऱ्यांचा शोध घेण्यासाठी बचावकार्याला वेग देण्यात आला असून, दुर्घटनेनंतर तब्बल ४० तास उलटूनही ८ कर्मचाऱ्यांचा अद्याप शोध लागलेला नाही. एनडीआरएफ (NDRF) आणि भारतीय लष्कराचे जवान युद्धपातळीवर शोधमोहीम राबवत आहेत.

दुर्घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर मलबा साचलेला असल्याने तो हटविण्याचे काम अखंडपणे सुरू आहे. जेसीबी आणि अन्य यंत्रसामग्रीच्या मदतीने ढिगारा हटविण्यात येत असून, मदतकार्यात कोणताही अडथळा येऊ नये यासाठी यंत्रांची नियमित ऑईल तपासणी व इंधन भरण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

घटनास्थळी महापालिका प्रशासन, अग्निशमन दल, पोलीस यंत्रणा तसेच विविध विभागांचे अधिकारी सतत उपस्थित राहून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. अडकलेल्या कर्मचाऱ्यांचा शोध घेण्यासाठी प्रत्येक शक्य त्या ठिकाणी काळजीपूर्वक उत्खनन सुरू आहे.
दरम्यान, ढिगाऱ्याखाली अडकलेल्या कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांची चिंता वाढली असून, सर्वांचे लक्ष बचाव पथकांच्या प्रयत्नांकडे लागले आहे. जवानांकडून जीव धोक्यात घालून सुरू असलेल्या या बचाव मोहिमेत लवकरच यश मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.




















Join Our Whatsapp Group