पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने आजपासून सांगवीतील पीडब्लूडी मैदानावर पवनाथडी जत्रा आयोजित करण्यात आली आहे. या जत्रेचे उद्घाटन सकाळी ११ वाजता आंतरराष्ट्रीय नेमबाज अंजली भागवत यांच्या हस्ते होणार होते. ठरलेल्या वेळेत अंजली भागवत, महापौर राहुल जाधव यांच्यासह सर्व मान्यवर आले होते. मात्र दुपारचे पावणे एक वाजले तरी चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप हजर न झाल्यामुळे प्रमुख पाहुण्यांसह सर्व पदाधिकाऱ्यांना उद्घाटनासाठी तब्बल पावणे दोन तास ताटकळत रहावे लागल्याने उपस्थितांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. अखेर एक वाजण्याच्या सुमारास जगताप उद्घाटनस्थळी दाखल झाले अन् उद्घाटन सोहळा पार पडला.
आमदारांच्या प्रतिक्षेत पवनाथडीचे उद्घाटन पावणे दोन तास रखडले…
![आमदारांच्या प्रतिक्षेत पवनाथडीचे उद्घाटन पावणे दोन तास रखडले...](https://pclive7.com/wp-content/uploads/2019/01/IMG_20190104_124244.jpg)