पिंपरी (Pclive7.com):- शिवसेना गटनेते नगरसेवक राहुल कलाटे यांचा वाढदिवस शहरभर विधायक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. ताथवडे येथील मदर तेरेसा प्रेरणा भवन या आश्रमातील निराधारांना मायेची ऊब देत राहुल कलाटे मित्र परिवाराच्या वतीने स्वेटरचे वाटप करण्यात आले.
यावेळी राहुल कलाटे, अमित गावडे, शाम लांडे, नगरसेविका रेखा दर्शिले, मिनल यादव, अश्विनी वाघमारे यांच्यासह विविध पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सध्याच्या कडाक्याच्या असह्य थंडीचा विचार करता राहुल कलाटे मित्र परीवार व समर्थकांनी यंदा गरजूंना स्वेटर व ब्लॅंकेट वाटण्याचा संकल्प केला होता,त्यानुसार प्रेरणा भवन या संस्थेतील लहानग्यांपासून जेष्टांपर्यंत सर्वांना मान्यवरांच्या हस्ते स्वेटर वाटण्यात आले.
वाकड चौकातील कलाटे यांच्या कार्यालय आवारात अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी कला, क्रीडा, राजकारण, साहित्य, शैक्षणिक, सामाजिक आदी क्षेत्रातील मान्यरांनी सकाळ पासूनच गर्दी करीत शुभेच्छा दिल्या.
यावेळी वाढदिवसनिमित्त व नव वर्षाचे औचित्य साधत तब्बल पाच हजार दिनदर्शिकेचे वाटप वाकड, ताथवडे आणि पुनावळे परिसरातील नागरिकांना करण्यात आले. राहुल कलाटे मित्र परिवाराच्या वतीने गणेश फेंगशे, मालेश कलाटे, वाल्मिक फरताळे, धनंजय कलाटे, सोमनाथ फेंगशे, निखिल कलाटे, रविंद्र गोफणे, बाळकृष्ण कलाटे, नितीन दर्शिले, निखिल घोटकुले, विक्रम वाघमारे, शरद वाघेरे यांनी आयोजन केले.






















Join Our Whatsapp Group