पिंपरी (Pclive7.com):- जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील नाशिक फाट्याजवळ मेट्रोचे काम सुरू असताना (क्रेन) ड्रिल मशीन रस्त्यावर कोसळली. शनिवारी दुपारी 2.30 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. रस्त्यावर वाहनांचा वर्दळ सुरू असतानात ही दुर्घटना घडली.
सध्या रस्त्यावरून ही क्रेन हटविण्याचे काम सुरू आहे. नेमका हा अपघात कसा घडला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र मेट्रोच्या भोंगळ कारभारामुळे दुर्घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये मेट्रोच्या या गलथान कारभाराबाबत संताप व्यक्त केला जात आहे. या दुर्घटनेमुळे या मार्गावरील वाहतूक खोळंबली आहे.






















Join Our Whatsapp Group