पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयासाठी शिवसेनेने सुरूवातीपासून पाठपुरावा केला आहे. आमच्या प्रयत्नांमुळेच शहरात स्वतंत्र आयुक्तालय झाले. मात्र त्याचे श्रेय भाजपच्या दोन्ही आमदारांनी लाटले असल्याची खंत पिंपरीचे आमदार गौतम चाबुकस्वार यांनी आज पत्रकार परिषदेत व्यक्त केली.
विविध विकास कामांचे ई-भूमीपूजन आणि पोलीस आयुक्तालयाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बुधवारी (दि.९) झाले. या कार्यक्रमात शिवसेना आमदार गौतम चाबुकस्वार हे देखील त्यांच्या मतदार संघातील प्रश्न मांडण्यासाठी उपस्थित होते. मात्र, त्यांना बोलण्याची संधी दिली नसल्यामुळे त्यांनी मुख्यमंत्र्यांवर नाराजी व्यक्त केली आहे.
गौतम चाबुकस्वार म्हणाले की, शहरामध्ये ४ज टक्के झोपडपट्टी भाग आहे. या झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन करावे लागणार आहे. हे पुनर्वसन झाले नाही. तर शहराची स्मार्ट सिटी होणार नाही. हे मला मुख्यमंत्र्यांना सांगायचे होते. पोलीस आयुक्तायाची मागणी शिवसेनेने केली होती. त्यासाठी वारंवार पाठपुरावा देखील केला होता. त्याचे श्रेय भाजपच्या आमदारांनी घेतले आहे. पोलीस आयुक्तालयानंतर आमची शहरासाठी स्वतंत्र कारागृहाची मागणी आहे. त्यासाठी देखील मी स्वतः पाठपुरावा करत आहे. हे खटले निकाली काढण्यासाठी स्वतंत्र न्यायालय व्हावे, यासाठी देखील राज्याच्या कायदा विभागातील अधिकारी आणि नगरविकास मंत्री यांच्यासोबत बैठक घेऊन चर्चा केली आहे. हे प्रश्न शिवसेना मांडत अाली असून त्याचे श्रेय मात्र, भाजप घेत असल्याचा आरोप करत चाबुकस्वार यांनी नाराजी व्यक्त केली.



















Join Our Whatsapp Group