पिंपरी (Pclive7.com):- वास्तुउद्योग कॉलनी, मासुळकर कॉलनी, पिंपरी येथील नवनिर्माण विकास मंडळाच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त पार्थिव शिवलिंगाची विधिवत स्थापना करण्यात आली. यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भस्म आरतीने परिसरात भक्तिमय आणि आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले आहे. ही भस्म आरती पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे

भगवान शिवाच्या जयघोषात आणि मंत्रोच्चारात पार्थिव शिवलिंगाची पूजा-अर्चा करण्यात येत आहे. भस्म आरतीच्या वेळी उपस्थित भाविकांनी मोठ्या श्रद्धा, भक्तीभाव आणि उत्साहाने सहभाग नोंदवत भगवान शिवाचे दर्शन घेत आहेत.

गणेशोत्सवासोबतच शिवभक्तीचा अनोखा संगम अनुभवण्याची संधी मिळाल्याने भाविकांमध्ये विशेष उत्साह दिसून येत आहे. मंडळाच्या या उपक्रमाचे परिसरातील नागरिकांनी स्वागत करत धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा जपण्याच्या प्रयत्नांचे कौतुक केले जात आहे.



















Join Our Whatsapp Group