पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी गावातील पवना मित्र मंडळाच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वांचा “पवनेचा राजा पुरस्कार २०२६” देऊन गौरव करण्यात आला. सामाजिक, सांस्कृतिक आणि सेवाभावी कार्याची परंपरा जपत मंडळाने समाजातील विविध क्षेत्रांत योगदान देणाऱ्या मान्यवरांचा सन्मान केला.

यावर्षी सांप्रदायिक क्षेत्रातील कार्यासाठी ह.भ.प. सतीश ज्ञानोबा गव्हाणे, सामाजिक क्षेत्रासाठी अशोक गणपत नाणेकर, पत्रकारिता क्षेत्रासाठी मिलिंद गोविंद भुजबळ (दैनिक सकाळ), क्रीडा क्षेत्रासाठी पै. खंडू बबन वाळुंज (प्रथम मावळ केसरी), कामगार क्षेत्रासाठी रमेश लक्ष्मण वाघेरे (सेंच्युरी एन्का), शैक्षणिक क्षेत्रासाठी संपत जगताप सर, वैद्यकीय क्षेत्रासाठी डॉ. संजय देवधर आणि उद्योजक क्षेत्रासाठी करण सिंघी यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.
तसेच कु. विशाखा अविनाश बालकवडे (नायब तहसीलदार) आणि अविनाश केदारी (API) यांना विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून आळंदी ते पंढरपूर वारीदरम्यान वारकरी भाविकांना आरोग्यसेवा पुरविणारे डॉ. देविदास शेलार यांचा त्यांच्या निस्सीम सेवाभावाबद्दल विशेष सन्मान करण्यात आला.

दरम्यान, पिंपरी-चिंचवड शहरातील उद्योजक तसेच चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष विजय पांडुरंग जगताप हे गोसेवा, वारकरी सेवा, धार्मिक, सामाजिक, राजकीय, कला, क्रीडा आणि शैक्षणिक क्षेत्रांत सातत्याने योगदान देत असल्याने त्यांच्या कार्याची दखल घेत मंडळाच्या वतीने त्यांना “विशेष समाजसेवा गौरव सन्मानपत्र” प्रदान करण्यात आले.
या पुरस्कार वितरण सोहळ्यास मंडळाचे अध्यक्ष विशाल विष्णुपंत वाघेरे, कार्याध्यक्ष व माजी विरोधी पक्षनेते दत्तात्रय वाघेरे, माजी नगरसेवक हनुमंत नेवाळे, प्रभाकर वाघेरे, ह.भ.प. व माजी नगरसेवक आप्पा बागल, नगरसेवक डब्बू असवाणी, शिवस्मारक समिती अध्यक्ष दत्तोबा नाणेकर, अण्णा कापसे, मनीष पंजाबी, गणेश ढाकणे, महादेव वाळुंजकर, दीपिका कापसे, अनिता वाळुंजकर, शारदाताई मुंडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
पवना मित्र मंडळाचा ५४ वर्षांचा सामाजिक, सांस्कृतिक आणि सेवाभावी वारसा पुढे नेत समाजातील विविध क्षेत्रांत कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्याचा हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी ठरत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.


















Join Our Whatsapp Group