पिंपरी (Pclive7.com):- भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सचिन काळभोर यांच्या वाढदिवसानिमित्त निगडी येथील सिद्धिविनायक गणेश मंदिर परिसरात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी शालेय विद्यार्थी व विद्यार्थिनींना वह्या-पुस्तकांचे वाटप करण्यात आले, तसेच सफाई कर्मचाऱ्यांचा सन्मान करून त्यांना मिठाईचे वाटप करण्यात आले.

सामाजिक उत्तरदायित्व जपत आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. वाढदिवस साजरा करण्याबरोबरच समाजोपयोगी कार्य करण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

सचिन काळभोर यांना वाढदिवसानिमित्त अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील, केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार अमित गोरखे, मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे, अनुप संजय धोत्रे, आदी मान्यवरांनी लेखी शुभेच्छापत्र पाठवून त्यांना शुभेच्छा दिल्या.

तसेच महापौर रवी लांडगे आणि निगडी परिसरातील अनेक मान्यवरांनी प्रत्यक्ष भेट देत सचिन काळभोर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यामध्ये शिवकुमार बायस, राहुल येवले, सुधीर भोसले, पप्पू हतागळे, विकास कांबळे, जयदेव भुवड, सचिन शिंदे, अनिकेत काळभोर, अफसर मुलाणी, राहुल सोनवणे, गणेश बाफना, रवी खैरनार, विशाल उबाळे, प्रवीण पायाळ, प्रसाद फिरोदिया, राजू शेख, रफीक शेख, जावेद शेख, महेबुब शेख, रोहिदास शिवणेकर, संजय बोराडे, सागर बोराडे आणि जगदीश चौधरी यांचा समावेश होता.
वाढदिवसानिमित्त आयोजित सामाजिक उपक्रमांमुळे आणि मान्यवरांच्या शुभेच्छांमुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.


















Join Our Whatsapp Group