पिंपरी (Pclive7.com):- पुणे वाहतूक पोलिसांचा अजब कारभार समोर आला आहे. पोलिसांनी चक्क चारचाकी गाडीला ट्रिपल सीटच्या पावतीचा दंड फाडला आहे. हा सर्व प्रकार निगडी मधील सूरज स्वीट येथे घडला असून ही चारचाकी गाडी पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांची आहे. त्यामुळे हा चर्चेचा विषय ठरत आहे.
सविस्तर माहिती अशी की, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या एम. एच-१४ सी.एल १५९९ चारचाकी गाडीला वाहतूक पोलिसांनी ट्रिपल सीटचा दंड ठोठावला आहे. यासाठी त्यांना २०० रुपडे दंड आकारण्यात आला. परंतु चारचाकी गाडीला ट्रिपल सीट दंड कसा हा प्रश्न सर्वांना पडला आहे. ही एक अक्षम्य चूक असून वाहतूक पोलिसांनी ती मान्य केली.
महापालिका आयुक्त यांच्या गाडीचा नंबर एम.एच-१४ सी.एल १५९९ हा असून सारखाच नंबर एका दुचाकीचा आहे. या दुचाकीवरून काहीजण ट वाहतूक पोलिसांना सीरियल क्रमांकात डी.एल च्या ऐंवजी चुकून सी.एल लिहिले होते. त्यामुळेच आयुक्तांच्या गाडीला पावती फाडली गेली. हा सर्व प्रकार नजरचुकीने झाल्याची कबुली निगडी वाहतूक पोलीस निरीक्षक रवींद्र निंबाळकर यांनी दिली असून ती चूक दुरुस्त करून घेतली जाईल असं सांगितलं आहे.