पिंपरी (Pclive7.com):- नगरसेविका निर्मलाताई संजय कुटे सोशल फाउंडेशनच्या वतीने पिंपळे सौदागर येथील पृथ्वीराज गार्डनमध्ये ज्युडो-कराटे चॅम्पियनशीप स्पर्धेचे आयोजन येथे करण्यात आले होते. या स्पर्धेचे नियोजन शितो-रियोसीको-काय कराटे-डु आसोसिएशनच्या वतीने करण्यात आले होते. या स्पर्धेला रहाटणी-पिंपळे सौदागर पारीसरातील सुमारे ५०० मुलांनी सहभाग घेत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
रविवार दि. ३ रोजी झालेल्या या स्पर्धेचे उद्घाटन पिंपरी चिंचवड महापालिका कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष बबनराव झिंजुर्डे, नगरसेवक शत्रुघ्न काटे, नगरसेविका निर्मला कुटे यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रेसिडेंट ऑफ महाराष्ट्र पोलीस कराटे कोच शिहान कैलास लबडे पाटील, प्रगतशील शेतकरी शिवनाथ काटे, पवना सहकारी बँकचे उपाध्यक्ष जयनाथ काटे, स्वीकृत नगरसेवक संदीप नखाते, आंतरराष्ट्रीय कबड्डी पंच दत्तात्रय झिंझुर्डे, राजु कुटे, चंद्रकांत कुटे, चिंधा कुटे, अण्णा मामा शेलार, उद्योजक संजय भिसे, संजय कुटे, राकेश भास्कर, फडणीस काका, अनयजी मुळे, संतोष सिंग आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी स्पर्धेत सहभागी मुलांना नगरसेविका निर्मलाताई कुटे सोशल फाऊंडेशनच्या माध्यमातुन ट्रॉफी, मेडल्स व प्रशस्तीपत्र देण्यात आले. पिंपळे सौदागर रहाटणी मधील कराटे आसोसिएशनच्या एकूण ७ शाखांपैकी प्लॅनेट मिलेनीयम सोसायटी शाखेलाही चँम्पियन्स ट्रॉफी देण्यात आली.
यावेळी नगरसेविका निर्मलाताई कुटे म्हणाल्या की, सदर स्पर्धेस लाभलेला नागरीकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद बघून व आजच्या पिढीतील मुलांना मैदानी खेळाला जास्तीत जास्त प्राधान्य दयावे. यासाठी भविष्यात देखील आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली अश्या प्रकारच्या आऊट डोअर, मैदानी खेळांचे आयोजन फाऊंडेशनच्या माध्यमातून करण्यात येईल.





















Join Our Whatsapp Group