पिंपरी (Pclive7.com):- दापोडीतील पवारवस्ती येथे पूर्ववैमानस्यावरून एका सराईत गुन्हेगाराचा डोक्यात दगड घालून खून झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना सोमवारी (दि.४) रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली.
सुनिल विठ्ठल आरडे (वय २६, रा.बोपोडी) असं खून झालेल्या सराईत गुन्हेगाराचं नाव आहे. तर यावेळी झालेल्या हल्ल्यात अनिकेत चांदणे हा गंभीर जखमी झालेला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार अारडे हा सराईत गुन्हेगार होता. तो त्याचा सोबती अनिकेत चांदणे याच्यासोबत दापोडीतील पवारवस्ती येथे रात्री दहा वाजण्याच्या सुमारास गप्पा मारत थांबला होता. यावेळी अज्ञात टोळक्याने त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात आरडे आणि त्याचा साथीदार चांदणे गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर या दोघांनाही रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच आरडे याचा मृत्यू झाला असल्याचो डॉक्टरांनी सांगितले. आरडे आणि संशयित आरोपीचा जमिनीचा वाद असल्याचे बोलले जात आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत असून हल्लेखोरांचा शोध सुरू आहे.





















Join Our Whatsapp Group