पिंपरी (Pclive7.com):- पिंपळे गुरव येथे सुरू असलेल्या मंदिराचा स्लॅब कोसळून जखमी झालेल्या कामगारांची राष्ट्रवादीचे नेते नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेऊन विचारपूस केली.
पिंपळे गुरव येथे सुरू असलेल्या महादेव मंदिराच्या सभामंडपाचा स्लॅब कोसळल्याने त्याखाली अडकून एका महिलेसह तिघांचा मृत्यू झाला आहे. तर ५ कामगार गंभीर जखमी झाल्यामुळे त्याला औंध येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या दुर्घटनेची माहिती मिळताच राष्ट्रवादीचे नेते नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी जिल्हा रुग्णालयात जाऊन जखमी बांधकाम कामगारांची भेट घेतली. त्यांची विचारपूस करून संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांना चांगल्या पद्धतीचे उपचार करण्याच्या सूचना दिल्या व संबंधित कामगारांच्या कुटुंबियांना दिलासा दिला.






















Join Our Whatsapp Group