पिंपरी (Pclive7.com):- शिवजयंती आणि स्वातंत्रवीर सावरकर स्मृतीदिनाचे अौचित्य साधत पिंपरी चिंचवड ब्राम्हण युनिटी फाऊंडेशनच्यावतीने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. चिंचवड येथील शंकर महाराज सेवा मंडळाने देखील या उपक्रमास सहभाग नोंदवला होता. चिंचवड येथील महात्मा फुले शाळेत रविवार दि.२४ रोजी हे रक्तदान शिबीर घेण्यात आले होते.

रक्तदान हे एक पवित्र काम व समाजाचे ऋण फेडण्याची एक संधी समजून ब्राह्मण युनिटी फाऊंडेशनच्या सदस्यांनी यात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. या उपक्रमास डॉ.अविनाश वैद्य, पिंपरी चिंचवड महापालिकेचे यशवंतराव चव्हाण रूग्णालय रक्तपेढी आणि पीएसआय रक्तपेढी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी मकरंद कुलकर्णी, उपेंद्र पेंडसे, श्रीपाद गांगल, रुपाली काळे, संदीप कुलकर्णी, शाम तानावडे, धनंजय कुलकर्णी, स्मिता टिल्लू, दिगंबर उचगांवकर आणि इतर कार्यकर्त्यांनी मोलाची भूमिका बजावली. यावेळी पिंपरी चिंचवड ब्राम्हण युनिटी फाऊंडेशनचे स्वानंद दिवशीकर यांनी भविष्यात असेच वेगवेगळे सामाजिक उपक्रम नागरिकांच्या सहभागातून राबविण्याचा संकल्प व्यक्त केला.






















Join Our Whatsapp Group