शिरूर (Pclive7.com):- शिरूर लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजपा युतीचे उमेदवार खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचाराने आता चांगलाच वेग घेतला आहे. आढळराव पाटील आणि आमदार बाबुराव पाचर्णे यांनी आज क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून शिरूर तालुकाच्या झंझावती प्रचार दौऱ्याला सुरुवात केली आहे.
शिरूर लोकसभा मतदार संघातील तळेगाव ढमढेरे येथे प्रचार दौऱ्यानिमित्त शिवाजीराव आढळराव पाटील यांनी भेट दिली. यावेळी गावकऱ्यांनी प्रचंड जल्लोषात स्वागत करून त्यांचा सत्कार केला. क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून प्रचार रॅलीला सुरुवात झाली. तळेगाव ढमढेरे मध्ये झालेल्या रॅली मध्ये ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. याप्रसंगी माझ्यासोबत शिरूर तालुक्याचे लोकप्रिय आमदार बाबुरावजी पाचर्णे, शिवसेना पुणे जिल्हा सहसंपर्क प्रमुख सौ.जयश्रीताई पलांडे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख पुणे अनिलजी काशीद, शिवसेना तालुका प्रमुख पोपटराव शेलार, युवासेना उपजिल्हाधिकारी बापूसाहेब शिंदे, भगवानराव शेळके, अमृताताई पठारे तसेच महायुतीचे आजी-माजी पदाधिकारी, शिवसैनिक व मित्र परिवार उपस्थित होते.