पिंपरी (Pclive7.com):- संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघात ५९.४९ टक्के एवढे मतदान झाले आहे. शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार श्रीरंग बारणे आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांच्यात ही प्रमुख लढत होत आहे. मावळमध्ये सर्वाधिक मतदान पनवेल – २,९८,३४९ आणि चिंचवड – २,८३,००४ विधानसभा मतदारसंघात झाले आहे. त्यामुळे या दोन मतदारसंघात जो कोणी उमेदवार अधिकची आघाडी घेईल त्याचा विजय निश्चित होणार असल्याचे मानले जात आहे.
(मावळ मतदारसंघात एकूण ५९.४९ टक्के मतदान)
विधानसभा मतदारसंघ निहाय मतदानाची टक्केवारी
पनवेल – ५५.३३%
कर्जत – ६७.७६%
उरण – ६७.२१%
मावळ – ६२.६०%
चिंचवड – ५६.२९%
पिंपरी – ५४.४६%
विधानसभा मतदारसंघ निहाय झालेल्या मतदानाची आकडेवारी
(एकूण मतदार संख्या २२,९७,४०५)
पनवेल – २,९८,३४९
कर्जत – १,८९,५८८
उरण – १,९५,१०१
मावळ – २,११,३८३
चिंचवड – २,८३,००४
पिंपरी – १,८९,४०४
(झालेले एकूण मतदान – १३,६६,८१८)